​जात वाद्य समीकरण मोडणारे तमासगीर

कलावंताना जातपात नसते असं म्हणतात परंतु आपल्या इथल्या समाज व्यवस्थे मध्ये जात पात त्याने काय वाजवावे इथवर रुजलेली दिसते . जस जश्या वर्ग व जात संस्था आपल्याकडे बळकट होत गेल्या तस तसे जातवार काम धंदे शिक्कामोर्तब झाली न दुसरे काही करणे निषिद्ध मानले जायचे .तसेच लोक कलावंत च्या गळ्यात वाद्य जणू सटवाई च बांधून गेली तेही जातवार वाद्य म्हणजेच ते वाद्य इतर समाजातील कलावंतांना निषिद्ध होत . किंवा समाज त्याला मान्यता देत नसे .खंजिरी भेदिकांसाठी डफ ऐवजी चालत नव्हती न आज ही चालत नाही ..
गुरव शिंग / हलगी , 
मुसलमान ताशा ,
कडे वाजवायला मांग समाज जणू राखीवच. परंपरागत लोक वाद्ये हि विशिष्ट जातीशी बांधलेली आहे तेच लोक संस्कृती च्या उपासकांच्या बाबतीत आपण पाहतो.
त्याच प्रमाणे सध्या जोरावर असलेली लोककला म्हणजे तमाशा .मुळात नावाच तमाशा असलेले तमासगीर तमाशा मध्ये येताना सर्व जाती बंधने झुगारून येतात .हे आपण पठ्ठे बापूराव यांच्या दोन ओळीतून पाहू शकतो .
श्रेष्ठ वर्ण मी ब्राम्हण असूनी , सोवळ ठेवलं घालून घडी , मशाल धरली हाती तमाशाची , लाज लावली देशोधडी ..

जातिच्या मिलाफामुळे विविध लोककलेमधून सिद्ध झालेली वाद्ये आपण तमाशा मध्ये पाहू शकतो .महाराष्ट्रात तमाशे पाहताना हे लक्षात आहे की ढोलकी , कडे ,तुणतुणे , झांज कोणीही वाजवताना दिसते . व याच जात संयोगाने जुन्या वाड्यांतुन नवीन वाद्ये हि विकसित होते गेले व तमाशात हि अवतरले जसे तमाशात आता हार्मोनियम दिसते ताशा असे हि वाद्य दिसतात. म्हणजे जात आणि वाद्य हे समीकरण तोडताना तमासगीर दिसतात..

आशिष पडवळ अकोले 8888577071

शपा नावाचे शस्त्र अंधार कापत जाते

मार्क्स फुले आंबेडकर अनोखी मोट बांधली     त्यावर इमला सौत्रान्तिक मार्क्सवाद असंतोषने चढवला..स्त्रीजातवर्ग दास्यांत लढा हाती घेतला
सत्यशोधक कम्युनिस्ट स्थापला
सत्यशोधक मार्क्सवादी असंतोष धुमसु लागला..

कृषीसंस्कृती स्त्रियांची देण
जाड ठस्यात उमटते
तंत्र अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र विधायक मांडणी
मुक्काम पोस्ट असंतोषाची छाप दाखवते..

प्रस्थापित मिथक तू चिकिस्तक पद्धतीने हाताळले
तुळजाभवानी रेणुका सीता मारुती अब्राम्हणी असंतोषाने उभे केले..

बुद्ध ही सत्यान्वेष करून स्वीकारले
बुद्ध भारतीय इतिहासातील लोकशाही स्वातंत्र व समतेचा अग्नीस्रोत असंतोषानं प्रसवल..

जात जाणीव प्रतीक अस्मिता
शिवाजी महाराज ढाल तलवार लढाई पराक्रम
यापुढे हि जाऊन जात्यांतक राजा असंतोषाची देण ठरली..

तीच आमच्यात स्व जागे करायला कारणीभूत ठरली..

अश्या विधायक लढ्याच्या चिरतरुण नेतृत्वाला स्मुतिदिनी विनम्र अभिवादन.. 💐💐

©आशिष पडवळ अकोले 8888577071..

कॉम्रेड सांगून गेला : ३ 

​चळवळीतील कार्यकर्ता कसा असावा यावर कॉ. गोविंद पानसरे निरूपण करतात . चळवळीसाठी विषयाचे यथायोग्य आकलन जसे लागते . तसे ते विषय योग्य प्रकारे लोकांच्या पर्यंत पोहचवणारे कार्यकर्ते हि हवेत.

विचारवंत कार्यकर्ता असतोच असे नाही . कार्यकर्ता मात्र विचार करणारा असावा लागतो . समाज बदलायला निघालेल्या कार्यकर्त्यांला विचारही करावा लागतो आणि कार्यही करावे लागते . विचारांतून कार्यास प्रेरणा मिळते . 

कार्यातून विचार परिपूर्ण होतो . नुसता विचार पुरेसा नसतो . नुसते कार्य पुरेसे नसते . दोन्ही असावे लागते . 

संदर्भ :- धर्म जात वर्ग आणि परिवर्तनाच्या दिशा -कॉम्रेड गोविंद पानसरे

नवस

व्यवस्थेच्या लख्तरांची पताका

तुझ्या मंदिरी फडकतात..

तोंड लपवत आब राखत

भक्त तुझ्या दारी धडकतात..

नवस फेडणारे नाना तर्हेचे भोग लावत

कुस्करलेली मूर्ती ओरबडतात..

भंगलेल्या मंदिरात न जाणो

कोणती मुक्ती शोधतात.. ??

©आशिष पडवळ 8888577071

१/४/१७

मावळत्या तुला सलाम

​ ज्ञानाचा राजहंस तू

जातीच्या डबक्यातला बेडूक झालास

अलग न आता सांगणे

तुझ्यातला माणूस केव्हाच मावळला…

#आशिष_पडवळ  8888577071.

तंत्र 

Technique is just first step towards to knowledge .The technique is not a spirituality. Not free sex ,  hangout alcohol drinking .. we can say that subjective technique, not objective , which means that it depends on subject. However, it is a physical technique, so I’m reluctant to use the word ‘subjective’; But also in the readjustment is subjective, because you do not use an external thing. You’re just using your body, mind and energy for all these things… 

© आशिष पडवळ 8888577071.

उपासक

मुळात हे सर्व लोक संस्कृतीचे उपासक( लोक या अर्थाने कि बऱ्याच ठिकाणी  आर्यत्तराना लोक संबोधले आहे ) हेच खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपून ठेऊन ती लोकांपर्यंत पोहचवत असून ही सर्व हक्कापासून मात्र वंचित आहे . व टाळबडवे महाराज मात्र भाकड कथा सांगून धन संपन्न होत आहे हे मात्र खरे. असो..

वंचित असणारी हि संस्था गण समाजात प्रमुख प्रवाहात होती असे आपण म्हणू शकतो व त्याचा मातृसत्ताक गणांशी जवळचा संबंध होता. त्याचा संबंध आपण ते वापरत असलेल्या गोष्टी किंवा आचरणा वरून  पाहू शकतो.

जसे की

१.देवींचे उपासक / किंवा असुर गणाचे उपासक

२.परडी –  तूळजा हि गणारानी परडी ने धान्याचा सम सामान वाटप करत असे. 

३.कवड्याची माळ :- *कालच्या पोस्ट मधील चुका* १)कवडी हे समतेचे प्रतिक नसून प्रजनन हे सुपिकतेशी जोडलेले असल्यामुळे , कवडी निवडली असावी ,कवडीचा आकार स्त्रीयोनीशी साधर्म्य सांगतो ,

तुळजाभवानी व येडेश्वरी यांच्या कवडीमाळेतही थोडासा फरक आहे , येडेश्वरीच्या कवडीवर पिवळसर वर्तुळ आहे …

दुसरी गोष्ट कवडी ही समुद्रात तयार होते ती क्रुत्रिम नसून नैसर्गिक आहे याचाच अर्थ असाही होऊ शकतो समुद्राशी तुळजाभवानी साम्राजाचा संबंध आला असावा किंवा तिच्या गणाचा व्यापारी संबंध आला असावा …

४.तांदूळ(साळ) / शाळू चे ताट:- शेतीच्या सुरुवातीचे पिक ज्याचा शोध स्त्री ने लावला ५.गण बोळवण

१.*गोंधळी :- *रेणुका/तुळजाभवानी उपासक*  गळ्यात कवड्याच्या माळा  घालतात .त्यात एक निरूपण करणारा नाईक असतो. तो
पुढील प्रमाणे गोंधळाची पूजा मांडतो नवे कापड अंथरूण त्यावर तांदळाचे चौक भरून त्यावर देवी ची स्थापना करतो व त्याला शाळू चा मखर बनवतो .. चौका सोमर पाच पात्या ठेऊन त्या पात्यावर थोडा थोडा भात सोडतात . शाळू चे ताट देवीचा मखर सजवायला वापरतात .

ज्ञानेश्वरीत गोंदळी शब्द भूत पिशाच्च असुर या अर्थाने वापरला आहे

तर दासोपंत गीतार्णवा तील एका ओवीत 

भुतांचा गोंधळी पडिलें | तें माणूस नव्हे आपुलें |म्हणजेच गोंधळी हि संस्था मुळात भूमातेशी संबंध असणारी संस्था आहे तर गोंधळ हे भूतगणाचे उपासना नृत्य आहे .

२. *भुत्या* हि तसाच *तुळजाभवानी वा रेणुका चे उपासक* त्यांचा दीक्षा विधी :-तांदळाचा चौक भरावा लागतो , चौक  बसून त्याच्या डोक्यावर तांदूळ टाकून दीक्षा संपन्न होतो.

३. *जोगतीण* :- डोक्यावर परडी (डॉ. रा.चिं.ढेरे परडी कडे जग वा जगाचा भार वाहन्याचे प्रतीक म्हणून पाहता) घेऊन असते. व जोगवा मागते. म्हणजेच आपला समान हक्क मागते .तीच परडी तुळजा या गणदेवी ची परडी ठरते.

कवड्या ची माळ :- डोक्यावर परडी (जग ) कवड्या ची माळ म्हणजे तुळजाभवानी चे उपासक जी तुळजाभावनी समतेचे द्योतक आहे.

४. *वाघ्या मुरळी* हि संस्था हि तशीच जी कुळाचारच्या वेळी बोलावली जाते . व कुळाचार हा पुन्हा तुळजा या गणमाते कडे घेऊन जातो. तर खंडोबा या कुळदैवत हि त्यात पूज्य असते .

अजून हि अश्या बऱ्याच संस्था आहे ज्याच्या मुळे लोकसंस्कृती टिकून आहे भले हि त्यांना त्याचा मूळ गाभा समजेल नसला तरी.आज या संस्था बऱ्याच प्रमाणात त्यांच्या हक्कापाऊण वंचित असल्या मुळे कोणी व्यसनाधीन , कोणी वैश्या बनलेले दिसतात.. या सर्व संस्थांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी किमान परिवर्तनवादी चळवळींनी पुढाकार घ्यावा असे माझे मत आहे ..

आशिष पडवळ 8888577071.

जात

गप्पा मारताना कुलुशीत मनानं विचारलं

तुझी जात कोणती ?

हसून म्हणाली

तुमच्या घरी आहे बाप

त्याच्या आडनावान तुम्हाला दिली जात

जिथं बापच नाही तिथ कसली जात ??

©आशिष पडवळ 8888577071

खुळा विचार

​देहाविना जीवन जगायचा तुझा विचार खुळा वाटायचा

तुझ्या म्हणण्याला उगाच च ओल्ड मंक चा वास यायचा

पोटासाठी १०बाय१०च्या बाजारात बरबाद झालेली तू

वय व कमाई यावर बोलायला लागली की दर्जाची अर्थशास्रज्ञ भासायची..

———-

#१०बाय१०                                        ©आशिष पडवळ 8888577071.