उपासक

मुळात हे सर्व लोक संस्कृतीचे उपासक( लोक या अर्थाने कि बऱ्याच ठिकाणी  आर्यत्तराना लोक संबोधले आहे ) हेच खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपून ठेऊन ती लोकांपर्यंत पोहचवत असून ही सर्व हक्कापासून मात्र वंचित आहे . व टाळबडवे महाराज मात्र भाकड कथा सांगून धन संपन्न होत आहे हे मात्र खरे. असो..

वंचित असणारी हि संस्था गण समाजात प्रमुख प्रवाहात होती असे आपण म्हणू शकतो व त्याचा मातृसत्ताक गणांशी जवळचा संबंध होता. त्याचा संबंध आपण ते वापरत असलेल्या गोष्टी किंवा आचरणा वरून  पाहू शकतो.

जसे की

१.देवींचे उपासक / किंवा असुर गणाचे उपासक

२.परडी –  तूळजा हि गणारानी परडी ने धान्याचा सम सामान वाटप करत असे. 

३.कवड्याची माळ :- *कालच्या पोस्ट मधील चुका* १)कवडी हे समतेचे प्रतिक नसून प्रजनन हे सुपिकतेशी जोडलेले असल्यामुळे , कवडी निवडली असावी ,कवडीचा आकार स्त्रीयोनीशी साधर्म्य सांगतो ,

तुळजाभवानी व येडेश्वरी यांच्या कवडीमाळेतही थोडासा फरक आहे , येडेश्वरीच्या कवडीवर पिवळसर वर्तुळ आहे …

दुसरी गोष्ट कवडी ही समुद्रात तयार होते ती क्रुत्रिम नसून नैसर्गिक आहे याचाच अर्थ असाही होऊ शकतो समुद्राशी तुळजाभवानी साम्राजाचा संबंध आला असावा किंवा तिच्या गणाचा व्यापारी संबंध आला असावा …

४.तांदूळ(साळ) / शाळू चे ताट:- शेतीच्या सुरुवातीचे पिक ज्याचा शोध स्त्री ने लावला ५.गण बोळवण

१.*गोंधळी :- *रेणुका/तुळजाभवानी उपासक*  गळ्यात कवड्याच्या माळा  घालतात .त्यात एक निरूपण करणारा नाईक असतो. तो
पुढील प्रमाणे गोंधळाची पूजा मांडतो नवे कापड अंथरूण त्यावर तांदळाचे चौक भरून त्यावर देवी ची स्थापना करतो व त्याला शाळू चा मखर बनवतो .. चौका सोमर पाच पात्या ठेऊन त्या पात्यावर थोडा थोडा भात सोडतात . शाळू चे ताट देवीचा मखर सजवायला वापरतात .

ज्ञानेश्वरीत गोंदळी शब्द भूत पिशाच्च असुर या अर्थाने वापरला आहे

तर दासोपंत गीतार्णवा तील एका ओवीत 

भुतांचा गोंधळी पडिलें | तें माणूस नव्हे आपुलें |म्हणजेच गोंधळी हि संस्था मुळात भूमातेशी संबंध असणारी संस्था आहे तर गोंधळ हे भूतगणाचे उपासना नृत्य आहे .

२. *भुत्या* हि तसाच *तुळजाभवानी वा रेणुका चे उपासक* त्यांचा दीक्षा विधी :-तांदळाचा चौक भरावा लागतो , चौक  बसून त्याच्या डोक्यावर तांदूळ टाकून दीक्षा संपन्न होतो.

३. *जोगतीण* :- डोक्यावर परडी (डॉ. रा.चिं.ढेरे परडी कडे जग वा जगाचा भार वाहन्याचे प्रतीक म्हणून पाहता) घेऊन असते. व जोगवा मागते. म्हणजेच आपला समान हक्क मागते .तीच परडी तुळजा या गणदेवी ची परडी ठरते.

कवड्या ची माळ :- डोक्यावर परडी (जग ) कवड्या ची माळ म्हणजे तुळजाभवानी चे उपासक जी तुळजाभावनी समतेचे द्योतक आहे.

४. *वाघ्या मुरळी* हि संस्था हि तशीच जी कुळाचारच्या वेळी बोलावली जाते . व कुळाचार हा पुन्हा तुळजा या गणमाते कडे घेऊन जातो. तर खंडोबा या कुळदैवत हि त्यात पूज्य असते .

अजून हि अश्या बऱ्याच संस्था आहे ज्याच्या मुळे लोकसंस्कृती टिकून आहे भले हि त्यांना त्याचा मूळ गाभा समजेल नसला तरी.आज या संस्था बऱ्याच प्रमाणात त्यांच्या हक्कापाऊण वंचित असल्या मुळे कोणी व्यसनाधीन , कोणी वैश्या बनलेले दिसतात.. या सर्व संस्थांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी किमान परिवर्तनवादी चळवळींनी पुढाकार घ्यावा असे माझे मत आहे ..

आशिष पडवळ 8888577071.