मी आज चार्वाक मांडला

यावत् जीवेत् सुखं जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत्

भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः  ll

ऋणं कृत्वा घृतं पिबेत् 👈 ऋण काढून तूप प्या असा सल्ला चार्वाक यांनी दिला असल्याचे माधवाचार्य म्हणतात नंतर डॉ आ ह साळुंके हि तशीच मांडणी करतात तर काही आमचे मित्र याचा अर्थ इतकी तूप सुबत्ता दाखवण्यासाठी हि घेतात. असो जिसकि जैसी सोच..आणि तेच श्लोक उचलून काही तुप पिण्याइतके समर्थ व्हा ..भलेही कर्ज काढावे लागले तरीही. जीवन -देह संपला की संपलेच की. असे सांगून अन्य दार्शीनिकांसारखेच चार्वाक यांना ना समजुतीने किंवा जाणून बुजून दूषण देऊन मोकळे होतात लोकायत चार्वाक खुशाल चेंडू दाखवून मोकळे होतात . पण ही शिकवण मुळात चार्वाकांची कि १४ व्या शतकात सावकारकी ने घातलेल्या थैमानातून जण सामन्यांना बोध देण्यासाठी मांडला गेला हे सांगणे मात्र कठीण . ऋणा मुळे कुटुंब धुळीस मिळते हे मात्र तूप प्या म्हणणारे विसरता.उत्पादनवर आधारित व्यवस्थेत रिण उचलने म्हणजे व्यवहार्य च आहे याच ऋण / रिण च्या बेस वर व्यापार व्यवसाय भरभराटीला येतात..
ऋण  म्हणजेच आपल्या गणिती भाषेत ऋण=मुद्दल + व्याज हे सूत्र सांगतो .. न चक्रवाढ बद्दल तर न बोललेच बरे ..
त्याच श्लोकातील शब्द घृत (तूप ) आयुर्वेदशास्त्रात तूप म्हणजे ‘आयुष्य वर्धिनी'(आयुष्य वर्धक )म्हणवले गेले आहे.  म्हणजेच प्रसंगी  हेल्दी निर्विकार जीवन जगण्यासाठी ऋण काढा पण मरत मरत जगू नका एकदा शरीर रुपी मेला तर सर्व संपले . हि मांडणी मात्र चार्वाकांच्या मूळ व्यक्तिमत्त्वाला न्याय्य ठरेल. व्यावहारिक व सकारात्मक जीवन जगण्याचा आशादायी सल्ला ठरेल..

कृषिगोरक्ष्यवाणिज्यदण्ड नित्यादिभिर्बुढ: |

दृष्टैरेव सदुपायैर्भोगाननुभवेद भुवि || 

यावरून अर्थोत्पादन करण्याकरिता कृषी गोरक्ष वाणिज्य आदी कर्म करणे व सामाजिक सुव्यवस्था राखण्याकरिता दंड नीती वापरणे व आपल्याच उत्पादन वाट्याला भोग घेणे ही चार्वाक शिकवणं .. या त्यांच्या सामाजिक सुव्यवस्था राखण्याच्या शिकवण किंवा सल्ला ऋण काढून तूप पिण्याच्या सल्ल्याला खोटे ठरवता .. 

रिण काढून सण करू नये म्हणणारे   तुकाराम महाराज  सांगणारे आता रिण काढून तूप प्या म्हणता हे विशेष ..

आशिष पडवळ 8888577071

Leave a comment