शपा नावाचे शस्त्र अंधार कापत जाते

मार्क्स फुले आंबेडकर अनोखी मोट बांधली     त्यावर इमला सौत्रान्तिक मार्क्सवाद असंतोषने चढवला..स्त्रीजातवर्ग दास्यांत लढा हाती घेतला
सत्यशोधक कम्युनिस्ट स्थापला
सत्यशोधक मार्क्सवादी असंतोष धुमसु लागला..

कृषीसंस्कृती स्त्रियांची देण
जाड ठस्यात उमटते
तंत्र अब्राम्हणी सौंदर्यशास्त्र विधायक मांडणी
मुक्काम पोस्ट असंतोषाची छाप दाखवते..

प्रस्थापित मिथक तू चिकिस्तक पद्धतीने हाताळले
तुळजाभवानी रेणुका सीता मारुती अब्राम्हणी असंतोषाने उभे केले..

बुद्ध ही सत्यान्वेष करून स्वीकारले
बुद्ध भारतीय इतिहासातील लोकशाही स्वातंत्र व समतेचा अग्नीस्रोत असंतोषानं प्रसवल..

जात जाणीव प्रतीक अस्मिता
शिवाजी महाराज ढाल तलवार लढाई पराक्रम
यापुढे हि जाऊन जात्यांतक राजा असंतोषाची देण ठरली..

तीच आमच्यात स्व जागे करायला कारणीभूत ठरली..

अश्या विधायक लढ्याच्या चिरतरुण नेतृत्वाला स्मुतिदिनी विनम्र अभिवादन.. 💐💐

©आशिष पडवळ अकोले 8888577071..